सुकट पात भाजी

साहित्य..

एक जुडी कांद्याची पात,

एक वाटी स्वच्छ धुवून भिजवलेले सुकट

हळद .. अर्धा चमचा,

तिखट .. एक चमचा

लसूण .. 10 ते 12 पाकळ्या बारीक चिरून

हिरवी मिरची .. 2 बारीक चिरून

तेल.… 2 टेबल स्पून ( फोडणी पुरते)

मीठ … अर्धा चमचा / ,चवी प्रमाणे

कृती…

प्रथम कांद्याची पाती पासून कांदे वेगळे काढून घ्यावेत … मग पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी

पातीचे कांदे देखील भाजीसाठी चिरून घ्यावेत

भाजी करण्यासाठी मध्यम आकाराची कढई गॅस वर ठेवून ती तापली की त्यात फोडणीसाठी तेल घालून लसणाच्या चिरलेल्या पाकळ्या त्यात घालून लालसर होऊ द्याव्यात मग त्यात चिरलेल्या मिरच्या आणि कांदा घालून गुलाबी रंगावर परतून त्यात भिजवलेली सुकट घालून परतून घ्यावी . मग हळद आणि तिखट घालून परतून … कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढावी. नंतर त्यात चिरलेली पात घालून परतावी.पातीला सुटलेले पाणी आटे पर्यंत परतत रहायचे सगळ्यात शेवटी मीठ घालून सगळ्या भाजीला लागेल असे परतून मंद गॅस करून परत एक वाफ काढावी

झटपट चविष्ट सुकट पात भाजी तयार ..!!

सादरीकरण

सौ. पल्लवी प्रधान,

प्रधान कॅटरर्स. पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *