साहित्य
१ वाटी भिजवलेले पिवळे मूग
२ मध्यम टोमॅटो
२ मोठे कांदे
२ लसणाच्या पाकळ्या
१ मोठा चमचा तिखट
१/२ चमचा हळद
मीठ चवी प्रमाणे
1 चमचा आलं लसूण पेस्ट
तेल/तूप नेहमी पेक्षा थोडे जास्त घायचे
1 चमचा अमूल बटर
कृती
पिवळे मूग ( सालासकट) 1 मोठी वाटी आदल्या रात्री स्वच्छ धुवून मोठ्या कापडावर पसरवून रात्रभर वाळवावे ,
दुसऱ्या दिवशी मंद आचेवर सोनेरी रंगावर खमंग भाजून मग कुकरमध्ये घालून चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्याव्या आणि मूग मऊसर शिजवून घ्यावे.
लसणाची फोडणी करून थोडी वाटीत काढून ठेवायची
मग त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतून त्यात हळद,आणि आले लसूण पेस्ट घालून परतल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतल्यावर तिखट मीठ घालायचे मग उकडलेले मूग आणि अंगासरशी पाणी घालून एक उकळी आली की तयार मेदगं त्यावर आवडत असेल थोडे बटर घालावे
सर्व्ह करतांना वाटीतील मेदग्यावर आधी काढून ठेवलेली लसणाची थोडी फोडणी घालायची किंवा मस्त बटर घालूनही छान लागते… गरम गरम मेदगं मऊ भात / चपाती/ भाकरी कशाबरोबरही छान लागते
सादरीकरण
सौ. पल्लवी प्रधान,
प्रधान कॅटरर्स. पुणे

