उपवासाचे पनीर इन व्हाईट ग्रेव्ही बरोबर भगरीच्या पुऱ्या

साहित्य

पनीर ग्रेव्ही..

पनीर 250 ग्रॅम

काजू पावडर … एक वाटी

क्रीम/फेटलेली साय … एक वाटी

गोड दही … अर्धी वाटी

आले पेस्ट … एक चमचा

साजूक तूप … 2 टेबल स्पून ( फोडणीसाठी)

हिरवी मिरची पेस्ट .. एक चमचा

मीठ … अर्धा चमचा/ चवीप्रमाणे

लिंबूरस … 1 मोठा चमचा

भगरीच्या/ वरईच्या पुऱ्या…

दोन वाटी भगरीचे पीठ

दोन मोठे चमचे साबुदाणा पीठ

जिरे पूड .. अर्धा चमचा

मीठ … अर्धा चमचा

पाणी .. पीठ मळण्यासाठी

तेल/ तूप … तळणीसाठी

कृती…

पुऱ्यांसाठी …

दोन्ही पीठे एक करून त्यात मीठ आणि जिरेपूड घालून लागेल तसे थोड्या पाण्यात घट्ट मळून 1 तास झाकून ठेवावे. परत पाण्याचा हात लावून पीठ मऊ मळून . प्लास्टिकच्या पिशवीवर थापून पुऱ्या तुपात नाहीतर तेलात तळून काढाव्या

पनीर ग्रेव्ही …

प्रथम पनीरला लिंबू रस आणि मीठ लावून अर्धा तास झाकून ठेवावे . नंतर त्यात आले पेस्ट, मिरची पेस्ट आणि दही लावून परत अर्धा तास झाकून ठेवावे. एक कढई गरम करून त्यात तूप सोडून … पनीरचे तुकडे हलक्या हाताने त्यात परतून घ्यावे ,. दह्याचे पाणी आटले की त्यात काजू पावडर आणि क्रीम घालून छान परतावे … मग अर्धी वाटी पाणी घालून थोडे हलवावे मग झाकण ठेवून एक वाफ काढावी … त्यात चवीप्रमाणे मीठ घालून परत अर्धी वाटी पाणी घालून एक उकळी आली की … पनीर इन व्हाईट ग्रेव्ही तयार .

सादरीकरण

सौ. पल्लवी प्रधान,

प्रधान कॅटरर्स. पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *